भांडुप येथे रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुप येथील विजय क्रीडा मंडळाच्या वतीने 33 व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे शिबीर होणार असून सतत 3 ते 33 वर्षे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी ‘जीवनदाता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी ‘जीवनदाता पुरस्कार 2021’चे वितरणही याच दिवशी करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संतोष कासले यांनी सांगितले.