
रिक्षाचालकांना शीव रुग्णालयापासून 900 मीटर अंतरावर शीव सर्कल येथे रिक्षा न्यायला परवानगी आहे. मात्र, आणीबाणीच्या परिस्थितीत हे अंतर खूपच धोकादायक ठरून यात एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या रिक्षांमध्ये रुग्ण आहेत अशा रिक्षांना शीव रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्याची परवानगी मिळावी, त्याचबरोबर सरसकट सर्वच रिक्षाचालकांना सायन रुग्णालयापर्यंत रिक्षा नेण्याची परवानगी द्यावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय लोकअधिकार संघाचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव अक्षय पगारे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

























































