
राजकारणी मंडळी एकमेकांच्या नकला करताना आपल्याला अनेकदा दिसतात. त्यामध्ये आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचाही समावेश झाला आहे. जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा हुबेहुब आवाज काढत त्यांची नक्कल केली. मोदींच्या भाषणाची स्टाईल मारत त्यांनी महागाईच्या मुद्दय़ावरून त्यांच्यावर टीकाही केली.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा हुबेहुब आवाज काढत त्यांची नक्कल केली. मोदींच्या भाषणाची स्टाईल मारत त्यांनी महागाईच्या मुद्दय़ावरून त्यांच्यावर टीकाही केली.#BhaskarJadhav pic.twitter.com/8OweqW0ypo
— Saamana (@SaamanaOnline) November 10, 2021
रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांच्यातील ही कला सर्वांनी पाहिली. ‘2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वी मोदी हे सर्वांना ‘इस देश में…साठ साल में… काँग्रेसने कुछ किया है क्या?’ असा सवाल विचारत होते. नागरिकही त्यांना उत्तर देताना काँग्रेसने काहीच केले नाही असे सांगत होते, मात्र मोदींनी त्यांच्या दोन्ही कार्यकाळांमध्ये काहीच केले नाही हे आता लोकांच्या लक्षात येत आहे’ अशी टीका जाधव यांनी मोदींच्याच शैलीत केली. काँग्रेसने जे करून ठेवले आहे ते विकायचे काम बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा असे आता लोक मोदींना बोलू लागले आहेत असेही जाधव म्हणाले.
मोदी सरकारच्या फुकट गॅस देण्याच्या उज्ज्वला योजनेचीही भास्कर जाधव यांनी खिल्ली उडवली. ‘फुकट गॅस देत आहेत म्हणून नागरिक मोदींच्या मागे धावत सुटले. मोदी सरकार गॅस फुकट देत नाही, ते तुमचा विश्वासघात करतील, अनुदान बंद करतील असे मी लोकांना सतत सांगत होतो. मोदी सरकारनेही घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान बंद केले. अनुदानामुळे एक वर्ष गॅस मोफत मिळणार होता, तो पूर्वीही मिळत होता, पण मोदी सरकारने मोफत मिळणारा गॅस विकत द्यायला सुरुवात करून देशातील लोकांची फसवणूक केली’ असे जाधव म्हणाले.































































