पाडवा आणि भाऊबीज, आज दुप्पट आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुख, समृद्धी आणि भरभराटीचे दान घेऊन आलेला दिवाळी सण उद्या आनंदाचा परमोच्च बिंदू गाठणार आहे. पाडवा आणि भाऊबीज असा दुहेरी योग जुळून आला  आहे.

ओवाळणी कधी कराल?

बलिप्रतिपदा वा पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो. उद्या दुपारी 2 वाजून 42 मिनिटांपर्यंत कार्तिक शुक्ल प्रतिपदा असली तरी बलिप्रतिपदा दिवसभर साजरी करता येईल. द्वितीया दुपारी 2 वाजून 42 मिनिटांनी सुरू होणार आहे. तरीही दिवसभर भाऊबीज साजरी करण्यास हरकत नाही. पत्नी आणि बहीण कोणीही अगोदर ओवाळले तरी चालेल, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

आनंदाचे वर्ष!

महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक वर्षांचा प्रारंभ होतो. या दिवशी आपण नवीन वर्षारंभ साजरा करीत असतो. या दिवसाला चैत्री पाडवा असे आपण म्हणतो. गुजरात आणि उत्तर हिंदुस्थानात विक्रम संवत् पाळला जातो. कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा विक्रम संवत् वर्षाचा पहिला दिवस असतो, या दिवसाला ’दिवाळी पाडवा’ म्हणून ओळखले जाते. उद्या विक्रम संवत् 2079 चा प्रारंभ होत आहे. या नूतन विक्रम संवत्सराचे नाव ’आनंद’ असे आहे. विक्रम संवत् हा उज्जयिनीस विक्रमादित्य राजाने सुरू केला. शालिवाहनाच्या शकामध्ये 135 मिळवले की विक्रम संवताचे वर्ष येते, असे सोमण यांनी नमूद केले.

हे करा…

  • सोने खरेदीला प्राधान्य द्या.
  • नवीन कार्याचा आरंभ करा.
  • सुवासिनींनी पतीला औक्षण करावे.
  • लक्ष्मीपूजनाला पुजलेल्या वह्यांवर हिशेब लिहिण्यास प्रारंभ करावा.