शत्रूबरोबर व्यापारी संबंध ठेवणे हा विरोधाभास – भिडे गुरुजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वाई

हिंदुस्थान बुद्धी, नैसर्गिक साधनसामग्री, कृषी, युवा, ज्ञान या सर्वच बाबतींत जगात अव्वल आहे, परंतु आमची मानसिक गुलामगिरी व सहन करण्याच्या प्रवृत्तीतून सुटका होत नाही, असे परखड मत ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संभाजी भिडे (गुरुजी) यांनी व्यक्त केले. दरम्यान, आपलेच लोक दहशतवाद, माओवाद्यांना मदत करतात. शत्रूराष्ट्रांकडून सीमेवर रोज आपले सैनिक मारले जातात आणि आपण त्यांच्याबरोबर व्यापारी संबंध ठेवतो आहोत हा विरोधाभास बदलायला हवा, असेही ते म्हणाले.

वाई येथील धनश्री मंगल कार्यालयात ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन पुनःप्रतिष्ठापना करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.