भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर बेछूट गोळीबार, तिघांचा मृत्यू, एक गंभीर

1830

भुसावळ शहरातील भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर रविवारी रात्री अज्ञाताने गोळीबार केला. अज्ञातांनी केलेल्या बेछुट गोळीबारात खरात कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेत रवींद्र खरात यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद करण्यात येईल, असे सांगितले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण काय आहे याबाबतही कोणतीही माहिती मिळालेली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

police

वादग्रस्त पार्श्वभूमी
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या समता नगर भागातील एका गटातील जमावाने प्रचंड दगडफेक केल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. रवींद्र खरात यांच्या समता नगर भागातील घराजवळ रवींद्र खरात, नरेंद्र उर्फ बाळा मोरे तसेच दुसर्‍या गटातील राहुल उर्फ बाळा सोनवणे, गिरीश तायडे यांच्यात वाद झाला. जमावाने खरात यांच्या चारचाकी वाहनासह दुचाकीची मोडतोड केली होती. घटनास्थळावरून पोलिसांना झाडलेल्या गोळीची रिकामी पुंगळी मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी रवींद्र खरात, नरेंद्र मोरे, राहुल सोनवणे, गिरीश तायडे यांना ताब्यात घेतले होते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

आपली प्रतिक्रिया द्या