न्यायालये काळ्या अक्षरांतील कायद्यांपुरती मर्यादित नाहीत! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रतिपादन

न्यायव्यवस्था ही लोकांच्या आकांक्षा आणि संविधानिक मूल्यांमधील पूल म्हणून काम करते. केवळ वाद सोडवण्याचे काम नाही, तर न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठsची तत्त्वे प्रत्यक्षात पाळली जातील, याची खात्री करण्याचेही न्यायसंस्थेचे काम आहे. न्यायालये काळय़ा अक्षरांतील कायद्यांपुरती मर्यादित नाहीत, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काठमांडू येथे बोलताना केले.

न्यायालये केवळ काळय़ा अक्षरातील कायद्यापुरती मर्यादित नसून समकालीन आव्हानांच्या पार्श्वभूमीवर न्यायाचा अर्थ लावण्याचे काम न्यायालयांवर सोपवले आहे. न्यायालयांची पारंपरिक भूमिका म्हणजे वैधानिक तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे हे समजले जात होते. तथापि, आज न्यायव्यवस्थेला केवळ मजकुराच्या वापराच्या पलीकडे जाऊन कायद्याची सखोल उद्दिष्टे आणि परिणाम यांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले जात आहे, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले.