बिग बॉस मराठीचं दार उघडलं, 15 स्पर्धकांची धमाकेदार एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस मराठीच्या तिसऱया पर्वाला सुरुवात झाली आहे. यामध्ये 15 जण सहभागी झाले आहेत. मराठीतील नावाजलेल्या चेहऱयांसोबत स्पर्धकांच्या यादीत असेही काही चेहरे आलेत, ज्यांना बिग बॉसच्या घरात बघून भुवया उंचवल्या आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये 100 दिवस घरामध्ये राहण्यासाठी चुरस बघायला मिळेल.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटीलदेखील स्पर्धक आहेत. अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर बिग बॉसच्या घरात एकत्र आले आहेत. स्नेहा- आविष्कार पतीपत्नी होते. दोघांनी घटस्पह्ट घेतलेला आहे. दोघे या घरात पुन्हा एकत्र कसे राहणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. रविवारी ग्रॅण्ड प्रीमियरमध्ये स्पर्धकांची धमाकेदार एंट्री झाली. त्यानंतर आता सीझनच्या पहिल्या आठवडय़ात घरांवर महिलांचे राज्य दिसेल.

तृप्ती देसाई
सोनाली पाटील
विशाल निकम
स्नेहा वाघ
मीरा जगन्नाथ
आविष्कार दारव्हेकर
डॉ. उत्कर्ष शिंदे
सुरेखा कुडची
गायत्री दातार
विकास पाटील
संतोष चौधरी
मीनल शाह
जय दुधाणे
अक्षय वाघमारे
शिवलीला पाटील