धोनीच्या नावाने होतोय स्कॅम, सावध राहा!

महेंद्र सिंह धोनीच्या नावाने स्कॅमर्स फेक मेसेज यूजर्सला पाठवत आहेत. यासंबंधी दूरसंचार विभागाने अलर्ट जारी केला. धोनीच्या नावाने कोणताही मेसेज आल्यास सावध राहा, असे दूरसंचार विभागाने म्हटले. ‘हाय, मी एमएस धोनी, तुम्हाला मी माझ्या खासगी अकाऊंटवरून मेसेज करत आहे. मी सध्या रांची बाहेर आहे. मी पॉकेट घरी विसरलो. तुम्ही मला तुमच्या फोनपेवरून 600 रुपये ट्रान्सफर करू शकाल? मी बसने घरी जाईन.’ लोकांना खरे वाटावे यासाठी स्कॅमर्स धोनीचा सेल्फीही पाठवतात.