
बिग–बॉस 16 फेम अब्दू रोजिक 7 जुलै रोजी लग्न करणार असून या लग्नसोहळ्यात अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान खास पाहुणा म्हणून हजेरी लावणार आहे. सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेयर करत याबाबतची अनाऊंसमेंट केली आहे. अब्दूचा नुकताच साखरपुडा पार पडला. त्याचे पह्टोही त्याने सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. अब्दूने आपला प्रेमविवाह असल्याचे म्हटले आहे. अमीरा आणि तो चार महिन्यांपासून एकमेकांना ओळखतात असे अब्दू म्हणाला.


























































