मुलीच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन पोलीस अधिकारी शिपायासोबत सेक्स करायला गेला, बायकोने केलेल्या फोनमुळे अडकला

उत्तर प्रदेशातील उन्नावमधल्या बिघापूर भागात घडलेल्या एका प्रकारामुळे पोलीस दलाची मान शरमेने खाली गेली आहे. या घटनेमुळे तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अवस्था अवघड झाली आहे. इथला एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस अधीक्षकांकडे मुलीच्या लग्नासाठी सुट्टी मागितली होती. ही सुट्टी मंजूर करण्यात आल्यानंतर हा अधिकारी एका महिला शिपायासोबत गुलछबूगिरी करायला एका हॉटेलमध्ये गेला होता. तिथे या दोघांनी बरीच मजामस्ती केली आणि त्या मजामस्तीचे व्हिडीओ देखील चित्रीत केले. या दोघांची ही मजामस्ती त्यांच्या अंगाशी आली असून हा सगळा प्रकार तिथल्या संपूर्ण पोलीस दलाला कळाला आहे. या दोघांच्या मजामस्तीचे व्हिडीओ हे व्हायरल झाले असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत काय बोलावे हे सुचेनासे झाले आहे.

पोलीस अधिकारी आणि शिपाई या दोघांनी हॉटेलमध्ये केलेल्या मजामस्तीचं बिंग अधिकाऱ्याच्या बायकोने काळजीपोटी केलेल्या फोनमुळे फुटलं. या अधिकाऱ्याला त्याची बायको फोन करत होती. मात्र अधिकाऱ्याचे दोन्ही फोन बंद लागत होते. आपल्या नवऱ्याचा खून झाला असावा अशी कुशंका बायकोच्या मनात निर्माण झाली होती. यामुळे घाबरलेल्या बायकोने ही बाब पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली. पोलिसांनी या अधिकाऱ्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन काय होते हे शोधायला सुरुवात केली. त्यांना कळाले की या अधिकाऱ्याने कानपूर नगरमधल्या एका हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मोबाईल बंद केला आहे. पोलीस मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास या हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली. त्यांना कळालं की पोलीस अधिकाऱ्याने आणि महिला शिपायाने त्यांची ओळखपत्रे दाखवून खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही दृश्ये आपल्या ताब्यात घेतली आहेत.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि पोलीस अधिकारी तसेच पोलीस शिपाई यांच्यातील शारिरीक संबंधांची क्लिप व्हायरल झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सुट्टी घेऊन मौजमजा करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा कार्यभार काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. महिला शिपाई त्यादिवशी सुट्टी घेऊन गेली होती अथवा कामावर असताना, काम सोडून गेली होती याचीही चौकशी करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक हा तपास करत असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि शिपाई यांच्यावर काय कारवाई करायची हे ठरवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील वृत्त दैनिक जागरण या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या