
बिहारमधील भाजपचे आमदार व माजी मंत्री प्रेम कुमार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने त्यांच्या अकाऊंटवर अश्लील फोटो अपलोड केले होते. हे फोटो समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तत्काळ प्रेम कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

प्रेम कुमार हे भाजपचे गया मतदारसंघाचे आमदार आहेत. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी जेव्हा फेसबुक लॉग इन करायचा प्रयत्न केला मात्र त्यांचे अकाऊंट सुरू नाही झाले. त्यानंतर काही वेळाने त्यांना काही कार्यकर्त्यांचे फोन आले व त्यांनी प्रेम कुमार यांच्या फेसबुकवर एका तरुणीचे आक्षेपार्ह फोटो असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रेम कुमार यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. काही दिवसांपर्वी बोधगया येथून 16 तरुणांना सायबर क्राईमप्रकरणी अटक केली होती.





























































