कोण मित्र, कोण शत्रू कळालेच नाही; नितीश कुमार यांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोण शत्रू कोण मित्र हे कळालेच नाही असे म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी मित्रपक्ष भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. बिहारमध्ये जदयूची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी  कुमार यांनी हे वक्तव्य केले आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे.

नितीश कुमार म्हणाले की कोण मित्र कोण शत्रू हे कळालेच नाही. नितीश कुमार यांनी भाजपवर टीका केल्याचे म्हटले जाते. या बैठकीत जदयू उमेदवाराने सांगितले की आपला पराभव हा लोक जनशक्ती पक्षामुळे नव्हे तर भाजपमुळे झाला.

जदयूचे उमेदवार चंद्रिका राय, बोगो सिंह, जय कुमार सिंह, ललन पासवान, अरुण मांझी आणि आसमां परवीन यांनी आपला पराभव मित्र पक्ष भाजपमुळे झाल्याचे सांगितले. अनेक भागात भाजपने आपल्याला मदतच केली नाही असा आरोपही जदयूच्या उमेदवारांनी केला आहे.