आईच्या साडीनेच बापाने मुलांचा गळा आवळला; तीन मुलींचा मृत्यू, दोन मुलं थोडक्यात बचावली

आईची साडी म्हणजे आई लांब असली तरी आपल्या जवळ असल्याची जाणीव होय. आईच्या साडीचं मुलांशी एक जवळचं नातं असतं. मात्र, बिहारमध्ये एका निर्दयी बापाने आपल्या तीन लेकींना पत्नीच्या साडीने फासावर लटकवलं आणि स्वत: सुद्धा गळफास घेतला. या घटनेत दोन मुलांचा जीव थोडक्यात वाचला असून मुजफ्फरपुर जिल्हा हादरून गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्दयी बापाचे नाव अमरनाथ असून त्याने 12 वर्षीय अनुराधा, 11 वर्षीय शिवानी आणि 7 वर्षीय राधिका यांचा खून केला आहे. तर 6 वर्षीय शिवम आणि 5 वर्षीय चंदन हे दोघे थोडक्यात वाचले आहेत. मुलांच्या आईचा मागच्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यामुळे वाचलेली दोन्ही मुलं अनाथ झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता अमरनाथने गळफास का घेतला? याचे कारण त्यांना अद्याप कारण समजेले नाही. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहे.