मृत व्यक्तीवरून राजकारण करणाऱ्यांना लाज वाटायला हवी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक जण आता मृत व्यक्तीवरून राजकारण करत आहे. ते जिवंत असताना त्यांची भेट घेण्यासाठी का कुणी कष्ट घेतले नाही? मृत व्यक्तीवरून राजकारण करणाऱयांना स्वत:ची लाज वाटायला हवी, असे लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी म्हटले आहे.

मी मांझी यांना माझ्या वडिलांच्या गंभीर प्रकृतीबाबत पह्नद्वारे माहिती दिली होती. मात्र तरीदेखील ते माझ्या वडिलांना पाहण्यासाठी आले नाहीत. आता ज्या प्रकारे मांझी माझ्या वडिलांबद्दल बोलत आहेत. रुग्णालयात असताना त्यांनी इतकी काळजी का नाही दाखवली, असा संतप्त सवाल चिराग पासवान यांनी हिंदुस्थानी अवाम मोर्चाकडून करण्यात आलेल्या मागणीसंदर्भात केला आहे.

नितीशकुमार हे प्रचाराला विकासाच्या मुद्दय़ावरून भरकटवण्यासाठी माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. माझा आग्रह असेल की, पुढील सभेत जेव्हा पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेण्यासाठी जाल तेव्हा माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांबाबत नक्की विचारून घ्यावे. माझ्या वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मोदीजी त्यांच्या सोबत होते, असा टोला चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांना लगावला आहे.