Bihar Election 2025 – आम्ही स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करत आहोत, मतमोजणी आधी तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ चे निकाल जाहीर होण्यापूर्वीच राजद नेते तेजस्वी यादव यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना तेजस्वी यादव म्हणाले की, “आम्हाला खात्री आहे की आम्ही स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करू. उद्याच्या निवडणुका आम्ही अगदी आरामात जिंकू.”

तेजस्वी यादव म्हणाले की, “आमचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रांवर उपस्थित आहेत. जर प्रशासनाने २०२० च्या चुका पुन्हा केल्या, कोणी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या, कोणी असंवैधानिक किंवा कोणी अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत असेल तर, जनता त्यांना जबाबदार धरेल.”

ते म्हणाले, “भाजपचे लोक घाबरले आहेत, अस्वस्थ आहेत आणि हे सरकार पडणार आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की, उद्या संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया मंदावण्याची रणनीती आखण्यात आली आहे. विशेषतः ज्या जागांवर मतमोजणी कमी आहे, परंतु आमचे कार्यकर्ते सतर्क आहेत आणि आमचा विजय निश्चित आहे. आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आणि विशेषतः निवडणूक आयोगाला निष्पक्षपणे मतमोजणी करण्याचे आवाहन करतो.”