‘अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूने झोडा’, केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिहारमधील बेगुसराय येथे एका सभेला गिरीराज सिंह संबोधित करत होते. त्यावेळी एका व्यक्तीने एका शासकीय अधिकाऱ्यांची तक्रार त्यांच्याकडे केली.

यावर बोलताना गिरीराज सिंह म्हणाले, ‘जर एखाद अधिकारी तुमचे म्हणणे ऐकत नसल्यास, बांबू उचला आणि त्याला झोडा.’ ते म्हणाले, ‘लहान-लहान गोष्टी मला सांगण्याची आवश्यकता नाही. हा तुमचा अधिकार आहे. जर तुमच्या अधिकाराची पायमल्ली होत असेल तर मी तुमच्यासोबत उभा आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला चुकीचे काम करण्यास सांगत नाही. तसेच कोणत्या अधिकाऱ्याचे बेकायदेशीर कृत्य सहनही करत नाही. यामुळे तुमची लहान-लहान गोष्टी माझ्यासमोर आणू नका.’

आपली प्रतिक्रिया द्या