कार्तिकेय सिंह यांच्याकडून कायदे मंत्रालयाचा भार काढून घेतला, चौफेर टीकेनंतर नितीश कुमार यांचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कार्तिकेय सिंह यांच्याकडे असलेला कायदे मंत्रालयाचा भार काढून घेतला आहे. बिहारमध्ये भाजपसोबतची साथ सोडत नितीश कुमार यांच्या जनता दल सेक्युलरने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत हातमिळवणी केली होती. नवं सरकार स्थापन करकेवेळी कार्तिकेय सिंग यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. कार्तिकेय सिंह हे एका अपहरण प्रकरणात आरोपी असून न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध वॉरंट जारी केलं होतं. कायदे मंत्र्याविरोधातच वॉरंट जारी झाल्याने नितिश यांच्यावर चहूबाजूने टीका केली जात होती.

कार्तिकेय सिंह यांच्याकडे असलेला कायदे मंत्रालयाचा भार काढून घेतला असला तरी त्यांचे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात कायम आहेत. त्यांच्याकडे आता ऊस उद्योग विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. या खात्याचे आधीचे मंत्री शमीम अहमद यांना कायदे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.