
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूकी आधीच राज्यातील तब्बल 75 लाख महिलांना दहा हजार रुपये देणार आहेत. शुक्रवारी बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून त्या दिवशी महिलांना हे पैसे त्यांच्या खात्यावर मिळणार आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत जोरदार फटका बसल्यानंतर भाजपप्रणित महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली व महिलांच्या खात्यावर दह महिना दीड हजार रुपये टाकले. त्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील असे जाहीर केले. मात्र आता महायुतीचे सरकार राज्यात येऊन वर्ष होत आले तरी अद्याप महिलांना 2100 रुपये मिळाले नाहीत. त्या उलट राज्यातील तब्बल 24 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात आले.
व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे देणार
मुख्यमंत्री महिला रोजगार योजने अंतर्गत महिलांना दिले जाणारे दहा हजार हे त्यांना एखादा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी दिले जाणार आहेत. त्यासाठी एकूण 7500 कोटींचा निधी देण्यात आला आहे. दहा हजार रुपये वापरून सदर महिला त्यांचा व्यवसाय सुरू करणार असून पुढे त्यांच्या प्रगतीनुसार सरकारकडून त्यांना व्यवसायवाढीसाठी दोन लाखापर्यंतची मदत केली जाणार आहे.
मोदी दिल्लीवरून पाठवणार पैसे
या योजनेच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीवरून ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत नितीश कुमार पाटणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधानान दिल्लीवरूनच महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करणार आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्याप मदत नाहीच
महाराष्ट्रातील मराठवाड्याला महापूराचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे संसार, शेती सर्वच उद्ध्वस्त झाले आहे. हवालदिल झालेला शेतकरी सरकारकडे मदतीच्या आशेने बघत असताना अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर झालेली नाही.