दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime women

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये दारुबंदी असतानाही नागरिक सरार्सपणे दारू खरेदी विक्री करत आहेत. अशाच एका घटनेमध्ये येथील मसौढी भागात दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईवर जीवघेणा हल्ला केला आहे. यात आई जखमी झाली असून तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे. राजकुमार असे त्याचे नाव आहे.

पाटणापासून ३० किलोमीटर अंतरावर मसौढी नावाचा भाग आहे. येथील कैलूचक गल्लीत राजकुमार नावाचा तरुण आई व वडिलांबरोबर राहतो. त्याला दारुचे व्यसन असून त्यावरुन त्याचा आईशी रोज वाद व्हायचा. रविवारी संध्याकाळीही त्याने आईकडे दारू विकत घेण्यासाठी पैसे मागितले. पण तिने त्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या राजकुमारने आईला मारहाण केली. हे बघताच त्याच्या वडिलांनी राजकुमाराला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट वडील मध्ये आल्याने त्याने त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर त्याने परत आईकडे मोर्चा वळवला व तिचा गळा दाबला. पण वडिलांनी मदतीसाठी आरडाओरड करताच राजकुमार तिथून पळाला. त्यानंतर आई वडिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसात राजकुमारविरोधात तक्रार दाखल केली. राजकुमार नेहमी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे आईने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राजकुमारला अटक केली.

summary-bihar-son-attack-mother