
नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून उदयपूरमध्ये कन्हैयालाल व अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारमध्ये एका हिंदू तरुणाला 20 मुस्लीम तरुणांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. या हिंदू तरुणाने नुपूर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यावरून त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे.
बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील सुरंगा गावात हा प्रकार घडला आहे. दीपक असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक व त्यांचा मित्र रईस हे एका चहाच्या टपरीवर चहा पीत होते. त्यावेळी त्यांच्यात नुपूर शर्माचा विषय निघाला. त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला.
रईस दीपकला नुपूर शर्माचे समर्थन करू नको असे सांगत होता. मात्र दीपक त्याचे ऐकत नव्हता. त्यानंतर रईसने फोन करून काहीलोकांना बोलावले. काही वेळानंतर जवळपास 20 एक तरुण तिथे पोहोचले. त्यांनी दीपकला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दीपक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

























































