सॅनिटाईझ करताना बाईकला आग, व्हिडीओ व्हायरल

1434

एका बाईकला सॅनिटाईझ करताना आग लागली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एक आठवड्यापूर्वीचा असून गुजरातच्या अहमदाबादमधल्या एका कंपनीच्या आवारातला आहे. अरविंद मिलमध्ये एक बाईक दाखल होत होती. तेव्हा सुरक्षा कर्मचारी या बाईकवर सॅनिटाईझ फवारणी करत होते. तेव्हा बाईकने अचानक पेट घेतला. सुरक्षा रक्षकांनी तक्त्काळ आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बाईक खूप गरम होती म्हणून गाडीने पेट घेतला, तेव्हा सॅनिटाईझ फवारणी करत असताना बाईक बंद ठेवावी असे कंपनीने म्हटले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या