
सामना प्रतिनिधी। मालवण
नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिरचा वार्षिक आषाढ जत्रोत्सव शनिवार ४ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात होणारी ही एकमेव यात्रा म्हणून या बिळवसच्या सातेरी देवीची ख्याती आहे.
बिळवस येथील सातेरी देवीचे मंदिर पूर्णपणे पाण्यात असून पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. या मंदिराच्या आषाढी जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ओट्या भरणे नवस फेडणे कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी जत्रोत्सवात सहभागी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.






























































