
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू हिने 30 एप्रिल 2016 ला टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले. बिपाशाच्या लग्नाला सहा वर्ष होत आली असून अद्याप या जोडप्याला मूल बाळ नाही. मात्र आता बिपाशा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
View this post on Instagram
बिपाशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात ती तिचे आई वडिल व पती करणसोबत डिनरसाठी एका हॉटेलमध्ये आल्याचे दिसत आहे. यात बिपाशाने निळ्या रंगाचे ओव्हरसाईज शर्ट टाईप ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये बिपाशा अगदी हॉट दिसत असली तरी असा ओव्हरसाईज ड्रेस घालून बिपाशा तिचा बेबी बम्प तर लपवत नाही ना असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. अनेकांनी त्या व्हिडीओवर बिपाशाला तू गरोदर आहेस का असा सवाल केला आहे.































































