
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू ही गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. बिपाशा ही लवकरच आई होणार आहे.
बिपाशाने 30 एप्रिल 2016 ला टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले. बिपाशाच्या लग्नाला सहा वर्षं झाली असून आता त्यांच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर तिने आणि करण सिंग ग्रोव्हरने दोन फोटो टाकून ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
या फोटोत बिपाशा पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसून येत आहे. थोड्या बोल्ड पद्धतीने या फोटोंना शूट करण्यात आलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी बिपाशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ती तिचे आई वडील व पती करणसोबत डिनरसाठी एका हॉटेलमध्ये आल्याचे दिसत होतं. यात बिपाशाने निळ्या रंगाचे ओव्हरसाईज शर्ट टाईप ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये बिपाशा अगदी हॉट दिसत असली तरी असा ओव्हरसाईज ड्रेस घालून बिपाशा तिचा बेबी बम्प तर लपवत नाही ना असा सवाल नेटकऱ्यांनी केला होता. अनेकांनी त्या व्हिडीओवर बिपाशाला तू गरोदर आहेस का असा सवाल केला होता. त्याचं उत्तर आता मिळालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.
View this post on Instagram






























































