अखेर भाजपने मान्य केले; ई-20 पेट्रोलमुळे 5 टक्के मायलेज कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई-20 पेट्रोलविरोधात संपूर्ण देशात टीकेची झोड उठत असतानाच आता केंद्र सरकारकडून ई-20 पेट्रोलमधील इथेनॉलमुळे 5 टक्के मायलेज कमी होत असल्याचे मान्य करण्यात आले आहे. मायलेज कमी होत असला तरी चांगले अॅक्सलेरेशन, उत्तम परफॉर्मन्स, पिक अप, अँटी नॉकिंग, हायर ऑक्टेन फ्युएल, क्लिनर पंबशन आणि लाइफ सायकल कार्बन एमिशन्समध्ये 40 टक्के घट असे फायदे मिळत असल्याचा दावादेखील केला आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉलमिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात दिल्लीमध्ये तीन मोठी आंदोलने होणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनांना विरोधी पक्ष, वाहतूक संघटना आणि `E20 जनता पार्टी’ने पाठिंबा दिला आहे.