…तर ममतांनी बांगलादेशचे पंतप्रधान व्हावे, भाजप आमदाराने फटकारले

1152

आसाममधील एनआरसी यादीत जवळपास 19 लाख लोकांची नावे नसल्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रॅली काढल्यावरून भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी फटकारले आहे. ‘जर इतकाच बांगलादेशींचा पुळका येत असेल तर ममता बॅनर्जींनी बांगलादेशचे पंतप्रधान होऊन दाखवावे’, अशा शब्दात सुरेंद्र सिंग यांनी ममता बॅनर्जींना फटकारले.

एनआरसी यादीत आसाममधील 3.29 कोटी जनतेपैकी जवळपास 19 लाख लोकांची नावे नाही आहेत. एनआरसी यादीत नावे नसल्याने आसाममधील जनतेत प्रचंड असंतोष आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी उत्तर कोलकाता येथे मठी रॅली काढली होती. या रॅलीच्या निषेधार्थ सुरेंद्र सिंग यांनी ममतांवर निशाणा साधला आहे. ‘ममता बॅनर्जी या हिंदुस्थानी आहेत त्या इथे राहू शकतात. पण जर त्या देशद्रोही लोकांच्या मदतीसाठी धावत असतील तर त्यांनाही पी. चिदंबरम यांच्यासारखा धडा शिकवलाच पाहिजे. त्या राजकारण करण्यासाठी बांगलादेशींची बाजू घेत आहेत. जर इतकंच राजकारण करायचे आहे तर त्यांनी बांगलादेशचे पंतप्रधान व्हावे’, अशी टीका सिंग यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या