जनतेने नाकारलेलेच देशात अफवा पसरवत आहेत, नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका

438

जनतेने ज्यांना साफ नाकारले आहे, तेच आज देशात खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत. पण त्याचा काही एक फायदा होणार नाही. त्याच्याकडे खूप कमी शस्त्रे उरली आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली.

भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले त्या वेळी नरेंद्र मोदी बोलत होते. जनता हीच खरी देशाची ताकद आहे. त्यांनीच पहिल्यांदा बिगर काँग्रेसी पक्षला बहुमत दिले. पण आज त्यांच्यामध्ये विरोधक खोटय़ा अफवा पसरवत आहेत. त्या खोडून काढण्यासाठी आपणही तेवढय़ाच ताकदीने जनतेपर्यंत पोहचले पाहिजे असे आवाहन मोदी यांनी कार्यकर्त्यांना केले.

सत्तेत असताना संघर्ष करणे एखाद्या राजकीय पक्षासाठी खूप कठीण असते. पण भाजप सत्तेत असताना अमित शहा यांनी पक्ष वाढवला ही खूप मोठी गोष्ट आहे. मी खूपच भाग्यवान आहे. इथे बसलेल्या सर्व नेत्यांसोबत काम करायला मिळाले. त्यांचे बोट पकडून शिकायला मिळाले, असेही मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या