भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश खणकर यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश खणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा आहे. 2017 सालच्या पालिका निवडणुकीनंतर भाजपकडून त्यांची स्वीकृत नगरसेवक नियुक्ती करण्यात आली होती. खणकर यांच्या जागी भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांची निवड होणार असल्याचे समजते. भाजपकडून पालिकेच्या 2022 मधील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदांच्या जबाबदाऱया नव्याने दिल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राजीनाम्यानंतर खणकर यांनी बोलताना सांगितले की, पक्षाने आपल्यावर आता उत्तर मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळेच संघटनात्मक पातळीवरील काम करण्यासाठी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.