
सीमावादावरून संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. जागोजागी चीनविरोधात निदर्शने करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांनी चीनविरोधात आंदोलन केले. पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ऐवजी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जों उनचा पुतळा जाळला आहे.
गुरूवारी बंगालच्या आसनसोल भागात काही कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी चीनविरोधात घोषणा दिल्या. त्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगचा पुतळाही जाळला. पण त्यांच्याकडून चूक अशी झाली की त्यांनी शी जिनपिंग ऐवजी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनचा पुतळा जाळला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी चीनविरोधात आंदोलन केले. पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ऐवजी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनचा पुतळा जाळला आहे. pic.twitter.com/FI3sY3qIt8
— Saamana (@Saamanaonline) June 18, 2020
भाजप कार्यकर्ता गणेश म्हणाले की आमचा चीनला विरोध आहे. लडाखमध्ये जे झाले त्याचा आम्ही निषेध करतो. चीनचे पंतप्रधान किम जोंग उनचा पुतळा जाळण्यासाठी आम्ही पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकर्यांनी भाजप कार्यकर्त्यांना ट्रोल केले आहे.



























































