इलेक्ट्रॉल बॉण्ड बंद झाल्यानंतरही BJP ला सर्वाधिक देणग्या, 83 टक्के निधी एकट्या भाजपकडे

टाटा ग्रुप नियंत्रित प्रोग्रेसिव्ह एलेक्टोरल ट्रस्ट (PET) द्वारे 2024-25 मध्ये दिलेल्या एकूण 915 कोटी रुपयांच्या राजकीय देणग्यांपैकी जवळपास 83 टक्के रक्कम भाजपकडे गेली तर, काँग्रेसला फक्त 8.4 टक्के भाग मिळाला. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेल्या विविध एलेक्टोरल ट्रस्ट्स च्या योगदान अहवालानुसार, सुप्रीम कोर्टने फेब्रुवारी 2024 मध्ये इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले, तरी भाजपच्या निधीत मोठ्या प्रमाणात घट झाली नाही. PET ने भाजपकडे 757.6 कोटी, न्यू डेमोक्रॅटिक ET ने 150 कोटी, हार्मनी ET ने 30.1 कोटी, ट्रायंफ ET ने 21 कोटी, जन कल्याण ET ने 9.5 लाख आणि एइन्झिगार्टिग ET ने 7.75 लाख रुपये दिले.

PET जे विविध टाटा कंपन्यांकडून देणग्या मिळवते आणि लोकसभा निवडणूक वर्षात त्यांचे वाटप करते, 2018-19 मध्ये एकूण 454 कोटी तीन पक्षांना वाटप केले होते. त्यातील 75 टक्के म्हणजेच 356 कोटी भाजपकडे गेले, काँग्रेसला 55.6 कोटी आणि तृणमूल काँग्रेसला 43 कोटी. प्रुडेंट एलेक्टोरल ट्रस्टचा अहवाल अद्याप उपलब्ध नसल्यामुळे त्यातून भाजपकडे किती वाटप झाले? हे निश्चित करता येत नाही.

भाजपला ट्रस्ट्सद्वारे 856.4 कोटी मिळाले, त्यात प्रुडेंटकडून 724 कोटी; तर 2023-24 मध्ये बॉण्ड्सद्वारे 1,685 कोटी मिळाले. काँग्रेसला PET कडून 77.3 कोटी, न्यू डेमोक्रॅटिक ET कडून 5 कोटी आणि जन कल्याण ET कडून 9.5 लाख रुपये मिळाले. प्रुडेंट आणि A B जनरल ET कडून काँग्रेसला 216.33 कोटी आणि 15 कोटी मिळाल्या. यामुळे 2024-25 मध्ये काँग्रेसला एकूण 313 कोटी ट्रस्ट्सद्वारे मिळाले.

PET ने ट्रस्ट्समार्फत तृणमूल, वायएसआर काँग्रेस, शिवसेना, बीजेडी, बीआरएस, जेडीयू, द्रमुक आणि एलजेपी-रामविलास यांना प्रत्येकी 10 कोटी देणग्या दिल्या. काँग्रेसच्या 2024-25 च्या देणग्या 2023-24 मध्ये मिळालेल्या 828 कोटी रुपयांच्या बॉण्ड्सपेक्षा कमी, परंतु 2022-23 च्या 171 कोटींपेक्षा जास्त आहेत. तृणमूलच्या 2024-25 च्या 184.5 कोटी निधीमध्ये 153.5 कोटी ट्रस्ट्सद्वारे आले, जे 2023-24 च्या 612 कोटी बॉण्ड्सपेक्षा कमी आहे. बीजेडीने 2023-24 मध्ये 245.5 कोटी बॉण्ड्समधून मिळवले, तर 2024-25 मध्ये ट्रस्ट्ससहित 60 कोटी मिळाल्या. बीआरएसचा निधीही घटला; 2023-24 मध्ये 495 कोटी बॉण्ड्स आणि 85 कोटी ट्रस्ट्सद्वारे मिळाल्या, तर 2024-25 मध्ये ट्रस्ट्सद्वारे फक्त 15 कोटी मिळा0ल्या.

टाटा ग्रुप कंपन्यांकडून PET ला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या. टाटा सन्स प्रा. लि. ने 308 कोटी, TCS ने 217.6 कोटी, टाटा स्टील ने 173 कोटी, टाटा मोटर्स ने 49.4 कोटी, टाटा पॉवर ने 39.5 कोटी, टाटा कम्युनिकेशन्स ने 14.8 कोटी आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, टाटा एल्क्सी आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स ने प्रत्येकी 19.7 कोटी रुपये दिले.

इतर ट्रस्ट्समधून महिंद्रा ग्रुप नियंत्रित न्यू डेमोक्रॅटिक ET ने 160 कोटींपैकी 150 कोटी रुपये भाजपला दिले. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला प्रत्येकी 5 कोटी. ट्रायंफ ET (CG पॉवर ने 20 कोटी योगदान) भाजपला 21 कोटी, तेलुगू देशम पार्टीला 4 कोटी दिल्या. हार्मनी ET ने भाजप ला 30.1 कोटी, शिवसेना- (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला 3 कोटी आणि एनसीपी-शरद पवार पक्षाला 2 कोटी दिल्या. जन प्रगती ET ने शिंदे गटालाला 1 कोटी दिली.