भाजपला टाटांकडून 356 कोटींचा निधी, सुब्रमण्यम स्वामींच्या प्रश्नामुळे पक्ष अडचणीत

2624

2018 ते 2019 मध्ये भाजपला तब्बल 800 कोटींचा निधी मिळाला आहे. इतर सर्व पक्षांच्या तुलनेत हा आकडा तब्बल तीन पट जास्त आहे. भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. भाजपला सर्वात जास्त निधी हा टाटा कंपनीकडून मिळाल्याचे देखील समोर आले आहे. यावरून भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपला सर्वात जास्त निधी हा टाटा समूहाच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्ट्रॉल ट्रस्टकडून मिळाला आहे. तब्बल 356 कोटींचा निधी या ट्रस्टमधून मिळाला आहे. त्यावरून स्वामी यांनी ट्विट केले आहे. ‘सरकारला सर्वात जास्त निधी हा टाटांकडून आला आहे. त्यामुळे एअर इंडिया हे टाटांकडे सोपवण्यावर शंका उपस्थित होऊ शकत नाही का?’, असे ट्विट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. त्यांच्या या ट्विटला हजारो रिट्विट्स व लाईक्स मिळाले आहेत. भाजप खालोखाल काँग्रेसला 146 कोटींचा निधी मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या