गोव्यात भाजपलाच स्पष्ट बहुमत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तृणमूल आणि काँग्रेस पक्षासोबत युतीचा प्रयोग जरूर करावा. पण गोव्याची जनता भाजपला स्पष्ट बहुमत देईल, असा दावा  विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपचे गोवा राज्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी  केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मणिपूरसह गोवा व उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. भाजपचे सरकार गोव्यात पुन्हा स्थापन होणार याबद्दल आता कोणाच्याही मनात फारशी शंका उरली नाही. आम्ही जनतेमध्ये जाऊन केलेली कामे सांगत आहोत. त्या आधारावर आम्ही मतं मागत आहोत. महाराष्ट्रात ज्या प्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही, असे फडणवीस म्हणाले.