
देशाच्या फाळणीसाठी महात्मा गांधी जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य एका भाजप नेत्याने केलं आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना त्यांनी हे विधान केलं आहे.
या भाजप नेत्याचं नाव रामेश्वर शर्मा असून ते मध्य प्रदेशचे हंगामी अध्यक्ष आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील गांधीनगर भागात एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत शर्मा यांनी हे विधान केलं आहे. या विधानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
या सभेवेळी शर्मा यांनी भाषण करताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली. शर्मा यावेळी म्हणाले की, कसं आहे.. नावामुळे गफलत होते. दिग्विजय सिंह हे कामाने आणि वागणुकीने जिना यांच्यापेक्षाही धोकादायक आहेत, असं शर्मा यावेळी म्हणाले. पण, दिग्विजय यांच्यावर टीका करताना शर्मा यांनी महात्मा गांधी यांच्यावरही टीका केली.
ते म्हणाले की, आधी जिना यांनी देशाची फाळणी केली. 1947मध्ये बापूं (महात्मा गांधी)च्या हातून चुक झाली आणि देशाचे दोन तुकडे झाले. अशीच फाळणी सिंह यांना करायची आहे, असं वादग्रस्त वक्तव्य शर्मा यांनी केलं. शर्मा यांची वादग्रस्त वक्तव्यं करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही काँग्रेस नेत्यांविरुद्ध अशी वक्तव्यं केली आहेत.
महात्मा गांधी की भूल की वजह से देश का विभाजन हुआ :
मध्यप्रदेश के प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा का बयान #MahatmaGandhi #Gandhi pic.twitter.com/T0iTsyyExy
— News24 (@news24tvchannel) January 11, 2021




























































