
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील भारतीय जनता पक्षाचे नेते संगीत सोम यांनी अभिनेता शाहरुख खानबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात संगीत सोम यांनी शाहरुख खान हा देशाचा देशाचा गद्दार असल्याचे म्हटले आहे.
संगीत सोम म्हणाले आहेत की, “सध्या बांगलादेशात हिंदू समुदायाविरुद्ध हिंसाचार आणि अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत काही लोक संवेदनशील मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि केवळ व्यावसायिक हितसंबंधांना प्राधान्य देत आहेत.”
ते म्हणाले, आयपीएलसारख्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळाडूंची खरेदी-विक्री केली जात आहे आणि शाहरुख खानशी संबंधित एका संघाने एका बांगलादेशी क्रिकेटपटूला सुमारे 9 कोटीमध्ये खरेदी केले आहे, असा आरोप त्यांनी केला. संगीत सोम म्हणाले, “शेजारच्या देशात हिंदूंची हत्या होत असताना अशा कृती राष्ट्राच्या भावनांविरुद्ध आहेत. अशा लोकांना देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही.”



























































