jaykumar Gore भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ऍट्रॉसिटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी मयत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱयातील दहिवडी पोलीस ठाण्यात जयकुमार गोरेंसह पाच जणांवर अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत गट नंबर 769 मधील अल्पभूधारक मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज करण्यात आला. यामध्ये संबंधित कुटुंबाची फसकणूक केल्याचा गोरेंवर आरोप आहे. महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीकरून हा गुन्हा दाखल झाला आहे.