पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भाजप आमदाराकडून हरताळ, काढली मशाल रॅली

3251

संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी आपल्या घराच्या खिडकीत किंवा बाल्कनीत येतून दिवा, मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले होते. परंतु भाजप आमदारानेच पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला हरताळ फासत मशाल रॅली काढली आहे. तेलंगाणातील भाजप आमदार राजा सिंह यांनी मशाल रॅली काढत गो कोरोना गो च्या घोषणा दिल्या आहेत.

राजा सिंह यांनी आपल्या समर्थकांसह मशाल घेत रस्त्यावर उतरले होते. मशाल घेऊन त्यांनी रॅलीच काढली आणि गो बॅक चीनी व्हायरस अशा घोषणा दिल्या. लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर पडू नये असे सरकारने सांगितले असताना राजा सिंह जमावासह बाहेर पडले. पंतप्रधान मोदी यांनी सोशल डिस्टसिंग पाळण्याचेही आवाहन केले होते. परंतु राजा सिंह यांनी या आवाहनाला हरताळ फासला.

आपली प्रतिक्रिया द्या