अश्लिलता पसरवणारा बिग बॉस बंद करा, भाजप आमदाराची मागणी

990


सलमान खानचा यंदाचा बिग बॉस चा सिझन हा पहिल्या आठवड्यापासूनच वादात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातून लव्ह जिहाद पसरवला जात असल्याचा आरोप बऱ्याच नेटकऱ्यांनी केला होता. त्यामुळे या शोवर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

एकीकडे कार्यक्रमातील काही वादग्रस्त दृष्यांमुळे चाहते संतापलेले असातनाच भाजपचे गाझियाबादचे आमदार नंद किशोर गुज्जर यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या शोमधून अश्लिलतेचा प्रचार होत आहे. त्यामुळे हा शो कुटुंबासोबत बघता येत नाही. हा शोमध्ये बऱ्याचदा आक्षेपार्ह दृष्य दाखवली जातात. दोन वेगवेगळ्या जाती धर्माच्या तरुण तरुणींना एकच झोपण्यासाठी एकच बेड दिला जात आहे. हे असले शो आपल्या देशाच्या संस्कृतीचा अपमान करत आहेत. त्यामुळे त्या शोवर बंदी घालावी’, अशी मागणी गुज्जर यांनी केली आहे. तशी मागणी करणारे पत्रच त्यांनी माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या