जनता जागी झाली तर मोदी सरकारही पडू शकते – अण्णा हजारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anna-hazare

भाजपसह कोणत्याही राजकीय पक्षांकडून देशाला उज्ज्वल भवितव्य मिळण्याची शक्यता नाही. सत्ताधाऱयांवर दबाव टाकण्यासाठी जनतेचे मजबूत संघटन आवश्यक आहे. झोपलेली जनता जागी झाली तर नरेंद्र मोदी सरकारही पडू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात ते बोलत होते.

2011 साली जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी मजबूत संघटनाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आंदोलनाची ‘टीम’ तयार केली होती, मात्र सदस्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी ती फुटली. टीममधील कोणी मुख्यमंत्री, कोणी राज्यपाल तर कोणी मंत्री झाल्याने मोठे नुकसान झाल्याची खंत हजारे यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी परिस्थिती सुधारलेली नाही. पूर्वी परकीयांनी देश लुटला आता स्वकीय लुटत आहेत. त्यांच्यापासून देश वाचवण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचे ते म्हणाले.