भाजप संघटन महासचिव पदावरून रामलाल यांना हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने मोठे बदल केले असून भाजप संघटन महासचिव पदावरून रामलाल यांना हटवण्यात आले आहे. त्यांची आता आरएसएसच्या सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप संघटन महासचिवपदी आता नागपूरच्या मराठमोळ्या सतीश वेलणकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे.

आरएसएसच्या अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी यापूर्वी अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होती. गोपाल आर्य यांची पर्यावरणशी निगडित घडामोडींसाठी राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, गेली दहा वर्षे संघटन महासचिवपदाची जबाबदारी रामलाल यांनी सांभाळली होती.