मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jayant-patil

मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. यापुढेही ती त्यांच्याच ताब्यात राहणार, आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिशन मुंबईची घोषणा करत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. याबाबत प्रश्न केला असता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, फडणवीसांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मुंबईत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी योग्य वेळी एकत्र बसून निर्णय करतील, असे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी असे फडणवीसांना वाटणे स्वाभाविक आहे, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेसोबत आहे तोपर्यंत भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही. मागील वेळी शिवसेनेबरोबर आमची लढाई आहे असे दाखवून त्यांनी त्यांची संख्या वाढवली. आता मुंबईकर भाजपला पाठिंबा देणार नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले.