आज काय होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  1. राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत महायुतीकडून भाजपातर्फे सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष युती करून निवडणुकीला सामोरे गेले असल्याने महायुती म्हणूनच सरकार स्थापन करण्यास भाजपची प्राथमिकता असेल.
  2. विधिमंडळातील मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. हे करीत असताना अन्य कुणीही सत्तास्थापनेचा दावा करण्यास पुढे येऊ नये असा प्रयत्न सायंकाळपर्यंत केला जाईल आणि सरतेशेवटी भाजप सरकार स्थापनेचे आमंत्रण मिळावे यासाठी सहयोगी अपक्ष आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र भाजपकडून राज्यपालांना सादर केले जाईल.
  3. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सर्व कारभार राज्यपालांच्या म्हणजेच पर्यायाने भाजपच्या हाती जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पेच सुटला नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पुन्हा राज्यपालांची भेट घेऊन घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू नये, अशी मागणी करतील.
  4. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी संपत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील सरकारचा कार्यकाळही संपणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे.
  5. राज्यपाल हे सरकार स्थापनेची प्रक्रिया कधीही सुरू करू शकतात. सर्वात आधी ते सत्तेत असलेल्या पक्षाला किंवा पक्षांच्या युती किंवा आघाडींना निमंत्रण देऊ शकतात. घटनेप्रमाणे हे निमंत्रण देण्यासाठी कोणत्याही कालमर्यादेचे बंधन नसले तरी सद्यपरिस्थिती भाजपला त्यांच्याकडून निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे.
  6. भाजपकडून बहुमताच्या आकडय़ासाठी शेवटपर्यंत जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्तास्थापनेसाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून मुदत घेऊन अल्पमतातील सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाईल.