गुरुवारी ईव्हीएममधून कमळच निघेल! मुख्यमंत्र्यांचा विश्वास

427

गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने जी कामे केली त्यामुळे मतदारांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आहे. परिणामी महायुतीला राज्यभरातून भरघोस मतदान होणर हे पक्के आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तलवारी म्यान, तोफा थंडावल्या! भरपावसात प्रचारसभा, बाईक रॅली व प्रचारयात्रांचा धडाका

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय होईल असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे मतदान करा की गुरुवारी निकाला दिवशी ईव्हीएममधून कमळच निघेल, असे आवाहन मतदारांना केले. भंडारा येथील भाजप उमेदवार अरविंद भालागरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी जोरदार सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारच्या पाच वर्षांतील विकासकामांचा लेखाजोखाही मांडला.

पावसाने रोखल्या अमित शहा यांच्या सभा

दरम्यान, मुख्यमंत्री दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उभे असून आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सकाळी त्यांनी एक रॅली काढून मतदारांची गाठभेट घेतली. माटे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली आणि त्यानंतर भेंडे ले आऊट परिसरात या रॅलीचे रूपांतर सभेत झाले.

आपली प्रतिक्रिया द्या