भाजप नेत्यांचा सभांचा धडाका, महाराष्ट्रात घेणार एक हजार सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजप उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात सुमारे एक हजार जाहीर सभा तसेच रोड शो होणार आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे या स्टार प्रचारकांचा धडाका उडणार आहे.

”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा येथे होणार आहे. त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 तारखेला कोल्हापूरात प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्याही 75 पेक्षाही अधिक सभा या राज्यात होतील. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे, चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार आहेत.

या नेत्यांशिवाय राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सैय्यद शाहनवाज हुसेन, मुख्यात अब्बास नकवी, रमणसिंग, केशव प्रसाद मौर्य हे स्टार प्रचारक देखील महाराष्ट्रात प्रचार करतील राज्यातील भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भंडारी, कांताताई नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत असे केशव उपाध्ये म्हणाले.