
सामना प्रतिनिधी । पुणे
लोकसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत. मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही 42 जागा जिंकल्या. यावेळी 43 की जागा जिंकू आणि 43वी जागा बारामतीची असेल. मागील निकडणुकीत कमळ चिन्ह असते तर भाजपने बारामतीची जागा जिंकली असती. आता ती चूक पुन्हा करायची नाही. यावेळी बारामतीमध्ये कमळ असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही आपल्या भाषणात हाच ‘43’चा राग आळवला.
बारामती, शिरूर आणि पुणे जिल्हा बूथ प्रतिनिधींच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्रात 45 पेक्षा कमी जागा जिंकल्या तर त्याला विजय म्हणता येणार नाही. 45 जागांमध्ये बारामती जागेचा समाकेश असायलाच पाहिजे असा संकल्प आपण केला पाहिजे, असा सल्ला शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, अफजल खान आज जरी जिकंत नसला तरी अफजल खानाच्या प्रकृत्तीचे लोक आज आहेत. त्यामुळे आज आपणास या अफजल खानांचा पराभव करून निवडणूकरुपी लढाई जिंकायची आहे. त्यामुळे बूथप्रमुखांनी मावळ्यांसारखे काम करावे.



























































