
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘शतप्रतिशत भाजप’ विजयी झाला आहे. सर्व 31 जिल्हा परिषदांवर भाजपाचे कमळ उमलले आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपने दणदणीत विजय मिळकला आहे.
गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात भाजपाने एकतर्फी विजय मिळवला होता. आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकांमध्येही निर्विवाद यश मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी व्टिट करून गुजरातमधील जनतेचे आभार मानले. मतमोजणीत सुरूवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली होती आणि सर्वच जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळवले. काँग्रेसला मात्र एकाही जिह्यात सत्ता मिळवता आली नाही. 231 पैकी 196 पंचायत समित्याही भाजपने जिंकल्या तर 33 पंचायत समित्या काँग्रेसने जिंकल्या.



























































