अंबरनाथ भाजपला खिंडार, असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

भाजपला अंबरनाथ शहरात खिंडार पडले असून शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. आतापर्यंत आमची फसवणूक झाली, पण यापुढे मरेपर्यंत भगव्याला अंतर देणार नाही, अशी शपथच घेतली आहे.

शहराच्या विकासासाठी शिवसेनेला भक्कम साथ देणार असल्याची ग्वाही शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली. भाजपचे माजी नगरसेवक सुनील सोनी, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सामेश्वर, राहल सोमेश्वर, बखत्यार चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा हाती देऊन सर्वांचे स्वागत केले.

शिवसेना ही सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असून अंबरनाथच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपशहरप्रमुख संदीप मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख आदी उपस्थित होते.