लडाखमध्ये जल्लोष, रस्त्यावर उतरून निर्णयाचं स्वागत केलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ladakh

सामना ऑनलाईन । लेह

मोदी सरकारने आज राज्यसभेत कलम 370 हटवण्यासंदर्भात ऐतिहासिक प्रस्ताव ठेवल्यानंतर देशभरात जल्लोष झाला. पण विशेष म्हणजे लडाखमध्ये देखील स्थानिक नागरिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त केला. चौकाचौकात लोकांनी एकत्र येऊन भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा दिल्या. काही जणांनी रस्त्यावर नृत्य करून आनंद व्यक्त केला.