
सामना ऑनलाईन । गुवाहाटी
आसामच्या गुवाहाटीत शनिवारी दुपारी एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुरावे शोधत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शुक्लेश्वर घाटाजवळ पान बाजारात हा स्फोट झाला.
Guwahati: Police present at the spot where an explosion occurred near Shukleshwar Ghat today, 4 people were injured. #Assam pic.twitter.com/9uHffEauWO
— ANI (@ANI) October 13, 2018
स्फोटाचा आवाज ऐकताच बाजारात एकच धावपळ उडाली. दुकानदारांनी तत्काळ आपली दुकाने बंद केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच अनोळखी वस्तूंना हात न लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गुवाहाटीच्या पोलिसांनी सांगितले की दुपारी पावणे १२ च्याच्या सुमारास हा स्फोट झाला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा कुठला दहशतवादी हल्ला नसल्याचे कळते. बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की तिथली भिंतच कोसळली आणि त्याचे अवशेष रस्त्यावर विखुरले गेले.




























































