लुधियाना न्यायालयाच्या इमारतीत बॉम्बस्फोट, 2 ठार, 4 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लुधियाना सत्र व जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत दुपारी साडे बाराच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात दोन जण ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळ पूर्णपणे रिकामे करून शोध कारवाई सुरू केली आहे. दरम्यान हा स्फोट न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरुममध्ये झाल्याचे समजते.

लुधियाना न्यायालयातील वकिलांचा संप असल्याने न्यायालयात फारच कमी माणसं उपस्थित होती. हा ब्लास्ट इतका शक्तीशाली होता की बाथरुमच्या भिंती कोसळल्या असून इमारतीतील काचेच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे.